बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना बाधितांबाबरोबर कोरोना मृताची संख्याही वाढत आहे. राज्यात सोमवारी कोरोना संसर्गामुळे १४६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यावर्षी एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी राज्यात १५,७८५ नवीन रुग्णांचा कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी राज्यात ७,०९८ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. दरम्यान राज्यात सध्या सक्रिय रूग्णांची संख्या वाढून १,४२,०८४ झाली आहे. सोमवारपर्यंत राज्यात कोविडमुळे एकूण १३,४९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत आहे. सोमवारी जिल्ह्यात ९,६१८ बाधित रुग्णांची भर पडली. तर ४,२२० रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परत आले आहेत. सोमवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनामुळेर ९७ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ५,२२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.