बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना वाढीचे सत्र सुरूच आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात कोरोना संसर्गाची ७,५७१ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. बेंगळूरमध्ये सर्वाधिक २,९४८ नवीन रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी राज्यातील ६५६१ रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात कोरोनाची ८३,०६६ सक्रिय प्रकरणे आहेत. गेल्या चोवीस तासात राज्यात एकूण ९३ कोरोना-संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी २२ जण बेंगळूर मधील आहेत.
बेंगळूर शहरी जिल्ह्यात शुक्रवारी सक्रीय रूग्णांची संख्या ३४,५३२ वर गेली. शुक्रवारी जिल्ह्यातील २५८० रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर बरे झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. शहरात कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत १६३५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.