बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात गुरुवारी कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या दोन हजारांपेक्षा कमी होती. नवीन रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपचाराधीन रूग्णांची संख्या कमी होत आहे. कर्नाटकात पूर्ण लॉकडाऊननंतर कोरोनासक्रिय रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ३२ हजारांवर पोहोचली आहे. राज्यात गेल्या २४ तासात १,९७७ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर ३,१८८ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर राज्यात गुरुवारी ४८ रुग्णांचा मृत्यू झाला. गुरुवारी राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण १.४२ टक्के होते. तर मृत्यू दर २.४२ टक्के होता.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात गुरुवारी ४६२ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर याचवेळी ५०१ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच १० कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २८,७८,५६४ लाखावर पोहोचली आहे. तर यापैकी २८,१०,१२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत ३६,०३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३२,३८३ इतकी आहे.