बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात पूर्ण लॉकडाऊननंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यासाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. दरम्यान राज्यात बुधवारी २८,८११ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या २४,९९,७८४ वर पोहोचली आहे. बुधवारी कोरोनामुळे ५३० रुग्णांचा मृत्यू झाला. यासह राज्यात एकूण मृतांची संख्या २६,९२९ वर पोहोचली आहे. बुधवारी राज्यात ४०,७४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
बुधवारी नोंदविण्यात आलेल्या नवीन कोरोना प्रकरणांपैकी ६,४३३ रुग्ण बेंगळूर शहरी जिल्ह्यात सापडले आहेत. बुधवारी जिल्ह्यात १८,३४२ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जिल्ह्यात २८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
२६ मे रोजी संध्याकाळपर्यंत राज्यात एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या २४,९९,७८४ वर पोहोचली. तर २०,६२,९१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत २६,९२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४,०९,९२४ आहे. बुधवारी राज्यात सकारात्मकतेचा दर १९.४८ टक्के होता, तर मृत्यु दर (सीएफआर) १.९७ टक्के होता.