बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत मोठी घट झाली आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस कमीकमी होत आहे. राज्यात सध्या ५५ हजारापेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहे. राज्यात शुक्रवारी २,९८४ नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली. तर १४,३३७ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर राज्यात शुक्रवारी ८८ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. शुक्रवारी राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण १.९२ टक्के होते. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५३,८७१ इतकी आहे.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी ५९३ रुग्ण आढळले. तर याचवेळी १०,६७४ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात ११ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला.