प्रतिनिधी / बेंगळूर
राज्य सरकारकडून 21 एप्रिल रोजी नागरी सेवा दिन हा राज्य सरकारी कर्मचारी दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून अत्युत्तम सेवा बजावलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱयांना दरवर्षी प्रजासत्ताक दिनी देण्यात येणारा सर्वोत्तम सेवा पुरस्कार देण्यात येणार आहे. यासंबंधीचा आदेशही राज्य कर्मचारी आणि प्रशासन सुधारणा खात्याच्या सचिव एन. एस. गायत्रीदेवी यांनी जारी केला आहे. राज्य कार्यकारी मंडळाच्या क्षेत्रात काम करणाऱया कर्नाटक प्रशासकीय सेवेतील अधिकाऱयांसह राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवरील अधिकारी, कर्मचाऱयांना राज्य सरकारी कर्मचारी दिन साजरा करावा लागणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे नागरी सेवा दिन हा कर्नाटकात राज्य सरकारी कर्मचारी दिन म्हणून दरवर्षी 21 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. विविध कार्यक्रम या दिवशी आयोजित करून अर्थपूर्ण पद्धतीने साजरा केला जावा, असे आदेशपत्रकात नमूद करण्यात आले आहे. उल्लेखनिय कामगिरी करण्याऱया कर्मचारी, अधिकाऱयांना प्रजासत्ताक दिनी देण्यात येत असलेला सर्वोत्तम सेवा पुरस्कार 21 एप्रिल रोजी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.