बेंगळूर/प्रतिनिधी
राज्य सरकारच्या आदेशानुसार कर्नाटकला आज कोविशील्डचे २ लाख डोस मिळणार आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री के सुधाकर यांनी दिली आहे. दरम्यान, राज्यांना लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने लसीकरणाची गतीही संथ आहे. राज्यात उपलब्ध लसीचा वापर ज्यांचा दुसरा डोस राहिला आहे त्यांना देण्यासाठी केला जात आहे. आता लस उपलब्ध होत असल्याने लसीकरणाला गती मिळणार आहे.
राज्य सरकारला केंद्राकडून आतापर्यंत १,२४,२०,५१० डोस मिळाले आहेत. ज्यात १,१३,२६,३४० डोसपैकीही (१,०१,६०,०६० कोविशील्ड आणि ११,६६,२८० कोव्हॅक्सिन) डोस मिळाले आहेत. तर राज्य राज्यसरकारने १०,९४,१७० (९,५०,००० कोविशील्ड आणि १,४४,१७० कोव्हॅक्सिन) डोस खरेदी केले आहेत, असेमंत्री के. सुधाकर यांनी सांगितले आहे.
तसेच राज्य सरकारने एका आठवड्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील कोविड -१९ लसीकरण तात्पुरते स्थगित केले होते. ते आता २२ मेपासून पुन्हा सुरु करणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.