बेंगळूर/प्रतिनिधी
देशात गुरुवारपासून ४५ वर्षा पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. दरम्यान कर्नाटकात पहिल्या दिवशी ५०,६२० व्यक्तींना लसीकरण करण्यात आले. लसीकरणाची एकूण संख्या ६,७४,३१६ इतकी झाली.
दरम्यान आरोग्य विभागाने गुरुवारी किती जणांना लसी दिली याचा जिल्हावार आकडेवारी दिली. एकत्रित आकडेवारीनुसार, बेंगळूर अर्बनमध्ये ९५,१२७ जणांना लस दिली असून त्यानंतर बळ्ळारी (४७,७६७), बबेळगाव (४२,४३७), बागलकोट (३९,१३३) आणि रायचूर (३०,०८८) चा क्रमांक लागतो.
बेंगळूर शहरी लसीकरण अधिकारी डॉ. सय्यद सिराजुद्दीन मदनी यांनी, जिल्ह्यात १,८६४ व्यक्तींना लसी देण्यात आल्या आहेत. “गुरुवार लसीकरणाचा पहिला दिवस असल्याने जिल्ह्यात आकडेवारी कमी आहे.
कर्नाटकातील ५,५०० लसीकरण केंद्रांपैकी ६५० खासगी असून त्यापैकी १३५ खाजगी सुविधा केंद्रे बेंगळूर मध्ये आहेत तर ४,८५० सरकारी सुविधा केंद्रे आहेत. आज बीबीएमपीच्या ५२५ केंद्रावर सुमारे १.५ लाख डोस पुरविण्यात आले आहेत.