बेंगळूर/प्रतिनिधी
शहरातील हायटेक डिफेन्स आणि एरोस्पेस पार्क योजनेसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेले ९० कोटी ५० लाख रुपये केंद्र सरकारकडे परत करण्यात आले. उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांनी ही माहिती दिली.
विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या वेळी जनता दल-एस सदस्य मरितिब्बे गौड़ा यांच्या प्रश्नावर त्यांनी, मार्च २०१९ मध्ये कॉंग्रेस आणि जनता दल-एस युती सरकारच्या कार्यकाळात या योजनेस मंजुरी देण्यात आली होती. यावेळी मरितिब्बे गौड़ा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली पण उद्योजकमंत्री जगदीश शेट्टर यांनी ते नाकारले. यानंतर सत्ताधारी आणि विरोधी यांच्यात वाद झाला, त्यानंतर जगदीश शेट्टर यांनी सदर प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांचा अभ्यास करून सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
जनता दल-एस बसवराज होरट्टी यांच्या प्रश्नावर त्यांनी लवकरच इस्पितळ बांधण्याच्या योजनेसाठी म्हैसूर लॅम्प्स कंपनीकडे यशवंतपूरमध्ये २१ एकर अतिरिक्त जमीन उपलब्ध आहे. म्हैसूर लॅम्प्स कंपनी आता बंद झाली आहे. शहरातील जागेचे मूल्य जास्त असल्याने या जमिनीचा योग्य वापर व्हावा यासाठी येथे रुग्णालये व इतर नागरी सुविधांसाठी आवश्यक इमारती बांधल्या जातील असे त्यांनी म्हण्टले आहे.