बेंगळूर/प्रतिनिधी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे खासगी सचिव म्हणून एस. एस. नकुल यांची नेमणूक करण्यात आली.
एस. एस. नकुल हे २०१० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. कोडगू (कुर्ग) जिल्ह्यातील कुशलनगर येथील रहिवासी असलेले नकुल यांनी २०१० च्या यूपीएससी परीक्षेत ३१ वा क्रमांक मिळविला होता आणि कर्नाटकमधून ते अव्वल स्थानावर होते.