आयुर्वेदातील पीजी चिकित्सकांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्यास विरोध
बेंगळूर/प्रतिनिधी
आज देशभरातील खासगी रुग्णालयांनी केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरुद्ध ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बेंगळूरसह कर्नाटकातील खासगी रुग्णालयांनाही रूग्णबाह्य विभाग (ओपीडी) आज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आज राज्यातील खासगी बाह्य रुग्णालय विभाग बंद राहणार आहेत. केंद्राने आयुर्वेदात पदव्युत्तर पदवीधरांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. या केंद्राच्या निर्णयाच्या विरोधात राज्यातील अॅलोपॅथी वैद्यकीय चिकित्सकांनी याला विरोध करत आज देशभरात ओपीडी बंद ठेवल्या आहेत.
दरम्यान खासगी रुग्णालये व नर्सिंग होम असोसिएशनचे (पीएचएएनए) अध्यक्ष प्रसन्न एच. एम. यांनी राज्यात ओपीडी बंद करण्याचे आवाहन हा इंडियन मेडिकल असोसिएशनने सुरू केलेल्या देशव्यापी निषेधाचा एक भाग असल्याचे म्हंटले आहे.
अलीकडील राजपत्रातील अधिसूचनेनुसार एमएस आयुर्वेद पदवीधरांना अॅलोपॅथी विज्ञानात विकसित आणि शिकवलेल्या बर्याच शस्त्रक्रिया करण्यास परवानगी आहे. यामुळे जनतेला धोका निर्माण होतो, असेही ते म्हणाले.