मुख्यमंत्र्यांना लगाम घाला
बेमालूर/प्रतिनिधी
कर्नाटकमधील नेत्यांच्या एका गटाने मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याविरोधात पक्षाच्या उच्च पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना लगाम घाला अन्यथा मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घ्या. अशी सूचना यावेळी केली.
शुक्रवारी नवनियुक्त राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रीय राजधानीत आलेल्या काही मंत्री, आमदार आणि इतर नेत्यांनी राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष आणि कर्नाटकचे नवनियुक्त प्रभारी सरचिटणीस अरुण सिंह यांना भेटले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांच्या चुकीचा पाढा वाचला. अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.
बैठकीत राज्य नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीविरोधात तक्रार केली. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सर्व नेत्यांना विश्वासात घेण्याचा सल्ला देण्याची सूचना त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना केली. अगदी काही नेत्यांनीही अशी सूचना केली की मुख्यमंत्र्यांचे वय लक्षात घेऊन मुख्यमंत्री बदलण्याची ही वेळ आता आहे, असेही ते म्हणाले.