बेंगळूर/प्रतिनिधी
शुक्रवारी कॉंग्रेसचे आमदार एच. पी. मंजुनाथ यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कॉंग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना व कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे म्हंटले आहे.
आमदार व त्यांच्या कुटुंबातील सदस्य होम क्वारंटाईन असून ते उपचार घेत आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या निकट संपर्कात आलेल्या लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून अलग राहून लक्षणे आढळल्यास कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.