बेंगळूर/प्रतिनिधी
राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सर्व देशभर कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या विनंतीनंतर सप्टेंबरमध्ये होणाऱ्या एमबीबीएस परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यापीठाचे कुलसचिव (मूल्यांकन) यांनी जारी केलेल्या परिपत्रकात १५ सप्टेंबरपासून घेण्यात येणारी परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षा १३ ऑक्टोबरला सुरू होईल. फी अधिसूचना आणि टाइम टेबल लवकरात लवकर वेबसाइटवर उपलब्ध केले जाईल, असे या परिपत्रकात म्हटले आहे.