बेंगळूर / प्रतिनिधी
कर्नाटकच्या आरोग्य विभागातील कार्यालयाच्या वाहन चालकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. चालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कर्नाटकचे आरोग्य आयुक्त पंकज कुमार पांडे यांच्यासह आरोग्य विभागातील नऊ अधिकाऱ्यांनी केसी जनरल हॉस्पिटलमध्ये जाऊन आपले स्वॅब तपासणीसाठी दिले आहेत.
यावेळी आयुक्त पांडे यांनी आमच्या ऑफिसमधील ड्रायव्हर्सपैकी एका ड्रॉयव्हरचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने माझ्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी स्वॅब तपासणीसाठी दिले आहेत. तसेच गेल्या 14 दिवसांपासून त्याने माझ्याबरोबर प्रवास केलेला नाही. तो चालक गेले सात दिवस सुट्टीवर होता. तो निरोगी आहे आणि वैद्यकीय देखरेखीखाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचण्या केल्या आहेत व त्या सर्वांना घरी अलग ठेवण्यात आले आहे, असे पांडे यांनी ट्विट करून सांगितले आहे.