बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांचा मुलगा चिदानंद सवदी याच्या कारने वेगाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी कारचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचे निधन झाले आहे. आता लक्ष्मण सावदी यांच्या मुलावर अपघातग्रस्ताच्या कुटुंबाला धमकावल्याचा आरोप आहे. चिदानंद सवदी याने वडिलांच्या पदाचा उपयोग करून केस दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे.
कुडप्पा (वय ५८) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो मूळचा चिक्कहंडागळ गावचा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी हंगुंड शहरालगत राष्ट्रीय महामार्ग-५० येथे कुडाळसंगमा क्रॉसजवळ झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, चिदानंद सवदी आपल्या मित्रांसह सहलीवरून परत येत होता. यावेळी हा अपघात झाला. तसेच पीडितेच्या नातेवाईकांचा आरोप आहे की त्यांनी पीडितेला दवाखान्यात नेण्याची पर्वा न करता घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनी घटनास्थळी उपस्थित स्थानिक रहिवाशांना धमकावले. पीडितेचा नातेवाईक सिद्दप्पा म्हणाले की, अपघातानंतर पीडितेला दवाखान्यात नेण्याऐवजी चिदानंदने तेथील स्थानिकांना उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याचे सांगून पळून जाण्याचा प्रयत्न केला.