बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेंगळूर येथील विधान सौध येथे सुरु आहे. दरम्यान राज्यात अधिवेशनाच्या आधी विधानसभेत गोहत्या बंदी विधेयक, लव्ह जिहाद विधेयक मांडण्याच्या हालचाली सुरु होत्या पण या अधिवेशनात फक्त गोहत्या बंदी विधेयक मांडले जाईल असे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे लव्ह जिहाद विधेयक हे पुढील अधिवेशनात मांडले जाणार आहे. यातच आता सुरु असणाऱ्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी भाजपने घोषित केलेल्या ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या संकल्पनेवर चर्चा केली जाणार नसल्याचे विधानसभा सभापतींनी स्पष्ट केले आहे.
सभापती विश्वेश्वर हेगडे कागरी यांनी मूळ वेळापत्रकांचे शेवटचे दोन दिवस म्हणजेच १४ आणि १५ डिसेंबर रोजी चर्चा करण्याचे नियोजन होते. अधिवेशन आता पाच दिवसांनी कमी करण्यात आल्याने ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या विषयावरील चर्चा पुढील अधिवेशनातच होईल, असे ते म्हणाले.