बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांचे माध्यम सल्लागार म्हणून एन. भृंगीश यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी त्यांनी माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक म्हणून काम पाहिले होते.
मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार महादेव प्रकाश यांनी गेल्या आठवड्यात राजीनामा दिल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार महादेव प्रकाश यांनी गुरुवारी वैयक्तिक कारणाने पदाचा राजीनामा दिला. भृंगीश यांनी २००८-११ दरम्यान मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या कार्यकाळात त्यांचे मीडिया सचिव म्हणून काम पाहिले होते.