बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसर्या लहरीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने गुरुवारी एसएसएलसी (इयत्ता दहावी) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाची घोषणा करताना प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार म्हणाले की सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल. “राज्यात वाढत्या कोविड प्रकरणांसह पालक, विद्यार्थी आणि अनेक शाळा संघटनांचा विचार करून कोणताही धोका उद्भवू नये यासाठी हा निर्णय घेतला आहे. कोविड -१९ च्या दुसर्या लाटेचा वेग कमी झाल्यानंतर परीक्षा कधी घेतल्या जातील हे सांगितले जाईल,” असे ते म्हणाले.
राज्यात २१ जून ते ५ जुलै या कालावधीत परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु आता कोरोनामुळे ती पुढे ढकलली आहे. सुधारित तारखांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये आणि त्याऐवजी अभ्यासाची तयारी चालू ठेवावी, असे कुमार यांनी आवर्जून सांगितले.