आरोग्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांचा खुलासा
बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी पुढच्या महिन्यात एसएसएलसी परीक्षा घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे उद्भवलेल्या गोंधळाचे निवारण करण्यासाठी हस्तक्षेप करण्यास तत्परता दर्शविली, कारण त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी परस्परविरोधी वक्तव्य केली आहेत. दरम्यान सोमवारी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर काही तासानंतर आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर म्हणाले की शिक्षण विभागाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाबद्दल त्यांच्या विभागाला काहीच माहिती नाही. दरम्यान, माध्यमांनी आरोग्य विभागाने परीक्षा घेण्याबाबत शिक्षण विभागाने केलेल्या शिफारशींबाबत प्रश्न विचारला असता मंत्री यांनी सुधाकर म्हणाले, “मला या निर्णयाविषयी माहिती नाही आणि या घोषणेवर मला शिक्षणमंत्र्यांचा सल्ला घेण्याची गरज आहे.
दरम्यान, आरोग्य मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी एसएसएलसी परीक्षा घेण्याचा निर्णय ‘एकतर्फी नाही, असे म्हंटले आहे. त्यामुळे शिक्षणमंत्री एस. सुरेश. कुमार यांनी एसएसएलसी परीक्षेचा निर्णय एकट्याने घेतलेला नसून मुख्यमंत्र्यांशी सल्ला मसलत करून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी सोमवारी जाहीर केले की दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाची परीक्षा १९ आणि २२ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. तथापि, काही तासांनंतर आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकारी तारखांची घोषणा केल्याबद्दल त्यांना माहिती नसल्याचे सांगितले. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, “या घोषणेवर मला शिक्षणमंत्र्यांचा सल्ला घेण्याची गरज आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिशानिर्देश दिले आहेत की नाही हे मला माहित नाही, परंतु आम्हाला मुलांच्या आरोग्याविषयी चिंता आहे, ” असे ते म्हणाले.