बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकार आज एसएसएलसी परीक्षेचे म्हणजेच दहावी परीक्षा २०२१ चे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा १९ जुलै आणि २२ जुलै रोजी घेण्यात येणार आहे.परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी sslc.karnaka.gov.in अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी असे म्हंटले आहे.
दरम्यान प्रवेशपत्र मात्र शाळेच्या अधिकार्यांनाच मिळू शकतील आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश पत्र त्यांच्या संबंधित शाळांमधून संकलित करणे आवश्यक आहे. प्रवेश पत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे शिक्षण विभागाने म्हंटले आहे.
दरम्यान प्रवेश पत्रे केएसईईबीच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड केली जातील. तथापि, विद्यार्थ्यांना ते स्वत: डाउनलोड करू शकणार नाहीत. त्यांच्या संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना ते वेबसाइटवरून डाऊनलोड करावे आणि ते त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रदान करावे लागतील. प्रवेश पत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळा प्रशासनाशी संपर्क साधावा. ज्यांना प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यात अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी केएसईईबीने 08023310075, 08023310076 हे हेल्पलाइन नंबर देखील सुरू केले आहेत.