बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात एसएसएलसी परीक्षेला सोमवारी सुरुवात झाली. सर्व खबरदारी घेत विद्यार्थ्यांचा पेपर घेण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी एसएसएलसी परीक्षेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांच्या मते, सोमवारी ८,५२,१९१ विद्यार्थ्यांपैकी ९९.६४ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मागील वर्षी हे प्रमाण ९८.३७ टक्के होती.
राज्यात सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास परवानगी दिली होती. कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली होती. दरम्यान, मंत्री एस. सुरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यभरातील कोविड केअर सेंटर मधील ५८ विद्यार्थ्यांनी परीक्षेस हजेरी लावली.