बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळ (KSEEB) ने एसएसएलसी (इयत्ता १० वी) पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जारी केले आहे. २७ आणि २९ सप्टेंबर रोजी दोन दिवस एसएसएलसी पुरवणी परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.
२७ सप्टेंबर रोजी विद्यार्थी गणित, विज्ञान आणिसमाज शास्त्र या विषयांवर बहुपर्यायी प्रश्नांसह एकत्रित पेपरला उपस्थित राहणार आहेत, तर २९ सप्टेंबर रोजी तीन भाषांच्या पेपरसाठी विद्यार्थी उपस्थिती राहतील, असे अधिकृत अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.
दरम्यान, अलीकडेच राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द तर दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. बारावीच्या विद्यार्थ्यांना पास करून सरळ पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला. तर शिक्षण विभागाने बहुपर्यायी प्रश्नांचे स्वरूप ठेवत दहावीची परीक्षा घेतली.