बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे राजकीय सचिव एन. आर. संतोष यांनी शुक्रवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी गंभीर आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यन संतोष यांनी एका एमएलसी आणि एका मंत्र्याला एक गोपनीय व्हिडिओ पाठविला होता, असा दावा करत केपीसीसी अध्यक्ष शिवकुमार यांनी शनिवारी खळबळ उडाली.
शिवकुमार यांनी मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव एन. आर. संतोष यांनी एक गोपनीय व्हिडिओ एमएलसी आणि एका मंत्र्यांना शेअर केला आहे हे मला कळले. ते एमएलसी आणि मंत्री, मुख्यमंत्री आणि सरकारमधील नेत्यांना ब्लॅकमेल करीत होते. गेल्या अनेक महिन्यांपासून असे घडत असल्याचे कॉंग्रेस अध्यक्ष म्हणाले. नंतर ते भाजपच्या उच्च कमांड नेत्यांपर्यंत पोहोचले.
शिवकुमार यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवाच्या आत्महत्येचा प्रयत्न करणे काही लहान गोष्ट नाही. या प्रकरणाची योग्य चौकशी करण्याची मागणी केली.
आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी संतोष शुक्रवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रमैया मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. असे म्हंटले जाते की संतोष यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.