बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक कॉंग्रेसचे ज्येष्ठ आमदार एच. के. पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. एच. के. पाटील हे माजी मंत्री आणि महाराष्ट्रातील कॉंग्रेस प्रभारी आहेत. त्यांनी स्वतः ट्वीट करून आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आहे.
६७ वर्षीय पाटील हे उत्तर-पश्चिम कर्नाटकमधील गदग विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी गेल्या काही दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना खबरदारी म्हणून चाचणी करून घेण्याची विनंती केली आहे. अलीकडेच कायदा मंत्री मधुस्वामी, उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ आणि गांधीनगरचे आमदार दिनेश गुंडू राव यांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनात हे सहभागी झाले होते.