बेंगळूर /प्रतिनिधी
कर्नाटक कॉंग्रेसचे आमदार बी. के. संगमेश आणि त्यांची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान संगमेश आणि त्यांच्या पत्नीची कोरोना चाचणी केली असता त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना बेंगळूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना कोरोना लागण झाली असून ते शहरातील मणिपाल रुग्णालयात दाखल आहे. भद्रावती मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे संगमेश यांनी रविवारी कोरोना चाचणी केली होती. तपासणीनंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.