बेंगळूर/प्रतिनिधी
चित्रदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे माजी खासदार मुदलगिरियप्पा यांचे पुत्र राजेश गौडा हे शनिवारी भाजपमध्ये दाखल झाले. सिरा विधानसभा पोटनिवडणुकीत पक्ष गौडा यांना मैदानात उतरवू शकते असा विश्वास आहे.
पक्षप्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना राजेश गौडा यांनी प मी तिकीट दावेदार म्हणून नव्हे तर पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्षात सामील झाला आहे. पक्षाने कोणालाही उमेदवारी दिली तरी मी पक्षासाठी काम कारेन. तसेच सीरा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मी कोणत्याही पक्षाला तिकीट मिळविण्यासाठी संपर्क साधलेला नाही.
दरम्यान भाजपाच्या कोर कमिटीने पोटनिवडणुकीसाठी तीन उमेदवारांची नवे निश्चित केली आहेत. यामध्ये बी. के. मंजुनाथ, एस. आर. गौडा आणि राजेश गौडा यांची नवे आहेत. यापैकी मंजुनाथ आणि एस. आर. यांनी यापूर्वी भाजपाच्या तिकिटांवर आपले नशीब आजमावले आहे.