बेंगळूर/प्रतिनिधी
अनलॉक दरम्यान कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या निर्देशानुसार कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (केएसआरटीसी) बसमधील प्रवाशांची संख्या मर्यादित करण्याचे आदेश जारी केले होते. ज्याअंतर्गत सामाजिक अंतर पाळण्यासाठी फक्त एका प्रवाशाला एका सीटवर प्रवास करण्याची परवानगी होती.
परिवहन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बस सीटच्या क्षमतेनुसार प्रवाशांना प्रवास करण्यास परवानगी दिली जात आहे. या आदेशामुळे आता अधिक प्रवासी महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करू शकतील, ज्यामुळे महामंडळाचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे.
तथापि सर्व प्रवाश्यांसाठी मास्क लावणे अनिवार्य असेल. एखाद्या बसची क्षमता ५२ प्रवाशांची असेल तर त्या बसमध्ये फक्त ५२ तिकिटे दिली जातील. कोणालाही उभे राहून प्रवास करण्याची मुभा दिली जाणार नाही.