बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमधील एसएसएलसी परीक्षा १४ जूनपासून घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी दिली आहे. ही परीक्षा २५ जानेवारीपर्यंत घेण्यात येईल. दरम्यान १ फेब्रुवारीपासून राज्यभरातील ९ वी,१० वी आणि प्रथम व द्वितीय वर्षाच्या पूर्व विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्ण-दिवस वर्ग घेण्याचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच राज्य सरकारने द्वितीय पीयूसी (बारावी) परीक्षेसाठी तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले. सर्व विषयांसाठी वार्षिक द्वितीय पीयूसी परीक्षा २४ मे ते १० जून दरम्यान घेण्यात येईल, असे म्हंटले आहे.
शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक भविष्य लक्षात घेऊन कोविड -१९ च्या राज्य तांत्रिक सल्लागार समितीशी सल्लामसलत करून हा निर्णय घेण्यात आला.
याबैठकीत बैठकीत आरोग्यमंत्री (के. सुधाकर) आणि कोविड -१९ तांत्रिक सल्लागार समिती सदस्यांशी चर्चा केली. इयत्ता ९ वी,१० वी, प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या पीयूसी (वर्ग ११ व १२) साठी पूर्ण दिवस वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. १ फेब्रुवारीपासून पूर्ण दिवस वर्ग सुरु होतील.