बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनाची गती मंदावली आहे. मंगळवारी राज्यात ६६२ जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यातील विविध जिल्ह्यातून १,३४४ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर कोरोना संक्रमित चार रुग्णांचा मृत्यू झाला. यासह राज्यात एकूण १२,०७४ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. दरम्यान राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ११,८६१ आहे.
राज्यात सर्वाधिक रुग्ण बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहेत. मंगळवारी जिल्ह्यात ३७० पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर ८४३ रुग्ण कोरोनावर विजय मिळवीत रुग्णालयातून घरी परतले. जिल्ह्यात सध्या ७,७५० रुग्ण उपचारात आहेत. तर आतापर्यंत ४,३०६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.