बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोनामुळे अनेकांचं जीवन उध्वस्त झालं आहे. अनेकांचा कोरोनाने बळी गेला. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. अनेक बालके अनाथ झाली आहेत. दरम्यान, कोरोनाने अनेक शेतकऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. कर्नाटक सरकारने कोरोनामुळे मरण पावलेल्या शेतकऱ्यांचे जिल्हा पत सहकारी संस्था (डीसीसी) आणि अॅपेक्स बँकांकडून घेतलेल्या १ लाख रुपयांत कर्ज माफ करण्यासंबंधी नितीन घेतला आहे. अंतिम निर्णय आणखी दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल, असे सहकार राज्यमंत्री एस. टी. सोमशेखर यांनी सांगितले.
सहकार मंत्री सोमशेखर यांनी, कोविडमुळे मरण पावलेल्या शेतकऱ्यांचा तपशील सादर करण्यासाठी सर्व सहकारी संस्थांना यापूर्वी सूचना देण्यात आल्या आहेत. आकडेवारी गोळा झाल्यानंतर सरकार निर्णय घेईल, असे ते म्हणाले. तसेच केंद्रात नवीन सहकार मंत्रालय स्थापन केल्याने सहकार क्षेत्राला चालना मिळेल, असे ते म्हणाले. तसेच केंद्रात सहकार मंत्रालयाच्या नव्या स्तराचे स्वागतही त्यांनी केले.