बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोविड -१९ प्रकरणे वाढत असल्याने कर्नाटकातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये फळांच्या विक्री व निर्यातीबाबत अनिश्चितता वाढली आहे. दरम्यान राज्य सरकारने बेंगळूरसाठी ऑनलाईन विक्री पोर्टल सुरू केले आहे.
कर्नाटक हे भारतातील आंबा उत्पादकांपैकी अग्रगण्य राज्य आहे. १६ जिल्ह्यांमध्ये १.६८ लाख हेक्टर क्षेत्रावर पिकाची लागवड केली जात आहे. यामध्ये बेंगळूर ग्रामीण, कोलार, चिक्कबळ्ळापूर, धारवाड व रामनगर आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.
मध्यमांशी बलताना रामनगर आंबा उत्पादक संघटनेच्या सदस्यांनी मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आमच्याकडे आंब्याचे चांगले पीक आले आहे. आम्ही बेंगळूर व इतर शहरांतील बाजारपेठेत यापूर्वीच विक्री सुरू केली आहे. वाहतुकीची अडचण झाली नसली तरी कोविडच्या घटनांमध्ये वाढ होत राहिल्यास यावर्षीही आम्हाला मागणी कमी होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.