बेंगळूरप्रतिनिधी
राज्याचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी केंद्र सरकारला आवाहन केले आहे की साथीच्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी कर्नाटकला अधिक प्रमाणात लसी द्याव्यात अशी मागणी केली. दरम्यान ११ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसह केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची व्हिडिओ परिषद झाली. यांनतर त्यांनी माध्यमांशी बोलताना बैठकीत झालेल्या चर्चेविषयी माहिती दिली.
राज्यातील दुसर्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी चाचणी वेग वाढवण्यासह राज्यात घेण्यात आलेल्या उपायांची माहिती मंत्र्यांनी दिली आणि तसेच केंद्राला जास्तीत जास्त लस वाटप करण्याची विनंती केली आणि रुग्णांना ऑक्सिजनची गरज लक्षत घेऊन त्याची उपलब्धता वाढविण्यास सांगितले, असे ते म्हणाले.
कोविड मार्गदर्शक सूचनांवर बोलताना मंत्री सुधाकर यांनी, सिनेमा हॉल, आंतरराज्य प्रवास, सभा आणि इतर सार्वजनिक मेळाव्यासंदर्भात देशभरात समान मार्गदर्शक तत्त्वे असावीत. “यासाठी अधिक स्पष्ट सूचना आणि त्यांचे पालन करण्यास मदत होणार आहे. म्हणूनच परिस्थितीतील गांभीर्याबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी सर्व बाधित राज्यांकडे समान मार्गदर्शक तत्त्वे असावीत असे ते म्हणाले.
“आम्ही दररोज १.१५ लाख ते १.२५ लाख चाचण्या घेत आहोत. ५ एप्रिलपर्यंत २,१९,८७,४३१ चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी १७७,६६,७९६ आरटीपीसीआर चाचण्या आहेत,” असे ते म्हणाले.
राज्यात मास्क घालणे अनिवार्य करणे, शारीरिक अंतर राखणे इ. सारख्या कोविड मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी केली आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याने २५० रुपये दंड आकारला आहे. आम्ही संवेदनशील कंटेनमेंट झोन देखील ओळखले आहेत. आम्ही ५ हून अधिक संवेदनशील झोन जाहीर करीत आहोत, असे ते म्हणाले.