वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना व्हायरस संकटाला तोंड देण्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला असून तीन आठवडय़ासाठी भारत लॉक डाऊन करण्यात आला आहे. पंतप्रधान मदतनिधी भक्कम करण्यासाठी अनेक उद्योगपतींनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हातभार लावले आहेत. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने पंतप्रधान निधीला 50 लाख रूपये तर राज्य शासनाला 50 लाख रूपये असे एकूण एक कोटी रूपयांची मदत रविवारी जाहीर केली आहे.
यापूर्वी भारतीय क्रिकेट मंडळाने 51 कोटी रूपयांची मदत जाहीर केली होती. विविध राज्यांच्या क्रिकेट संघटनातर्फे यापूर्वीच निधी जाहीर करण्यात आला आहे. मुंबई तसेच बंगाल आणि सौराष्ट्र क्रिकेट संघटनांनी पंतप्रधान मदतनिधीमध्ये आपला हातभार लावला आहे. कोरोना व्हायरसमुळे देशामध्ये मृतांची संख्या 25 झाली असून याची बाधा किमान 1000 लोकांना झाली आहे.