म्हैसूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे गृहराज्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी मंगळवारी गेल्या सहा महिन्यांत ड्रग्स जप्त करण्याचे प्रमाण मागील दहा वर्षांत समान पातळीवर गेले, असल्याचे म्हंटले. राज्यात ड्रग्जची साखळी मोठी असून पोलीस त्याची पाळेमुळे शोधून काढत आहेत.
दरम्यान ड्रग्जवरील कारवाई सुरूच राहील आणि हा धोका आमच्या समाजातून पुसून टाकला जाईल. पोळी आणि गृह विभाग याविषयी कोणतीही तडजोड करणार नाहीत. आरोपींना योग्य ते शासन केले जाईल, असे गृहमंत्री बोम्माई म्हणाले.
म्हैसूरयेथे बोलताना बोम्माई यांनी सायबर क्राइम आणि इतर आर्थिक गुन्ह्यांसह सर्व जिल्ह्यांमध्ये समर्पित कक्ष स्थापन केले जातील. तसेच पोलीस कर्मचार्यांना उद्देशून त्यांनी पोलीस गृह २०२० हा प्रकल्प डिसेंबर महिन्यात पूर्ण होईल. हा प्रकल्प ११,००० घरांचा असून लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी डिसेंबरमध्ये पूर्ण केला जाईल, असेही ते म्हणाले.