बेंगळूर/प्रतिनिधी
आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी गेल्या २४ तासात राज्यात कोरोना सकारात्मकतेचा दर कमी झाल्याचे सांगितले. राज्यात सध्या कोरोना साकारात्मकतेचा दर १.८३ टक्क्यांवर आला आहे. दरम्यान गुरुवारी राज्यात आणखी २,११६ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. तर राज्यभरात ३,३६८ लोक कोरोनातून बरे होऊन घरी परतले.
दरम्यान, कर्नाटकमधील सक्रिय प्रकरणे आणखी घटून २९,४७० वर आली आहेत. त्याच वेळी, राज्यभरात १,१५,३८६ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. राज्यात आता पर्यंत ११,४७४ नागरिकांचा कोरोनाने बळी गेला आहे.
राज्यात सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण बेंगळूर जिल्ह्यात आहेत. गुरुवारी जिल्ह्यात १०,६९ नवीन कोरोना रुग्ण सापडले. तर ९९१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. शहरातील ८ मार्चपासूनची एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३.५४ लाखांवर गेली आहे.