बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकातील रूग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यासाठी राज्यातील ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येतील, असे कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी गुरुवारी सांगितले. ते बुधवारी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी जाहीर केलेल्या पॅकेजचा संदर्भ देत होते. येडियुरप्पा म्हणाले होते की राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून ६ हजार ग्रामपंचायतींना आगाऊ रक्कम दिली जाईल. सुधाकर यांनी पत्रकारांना सांगितले की, “मुख्यमंत्र्यांनी सर्व ग्रामपंचायतींना ५० हजार रुपये आगाऊ रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड रूग्णांना केअर सेंटरमध्ये हलविण्यासाठी ग्राम टास्क फोर्स समिती या निधीचा उपयोग करेल,” असे सुधाकर यांनी पत्रकारांना सांगितले.