बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने सोमवारी चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
बदली झालेला अधिकारी आणि त्यांची नवीन पोस्टिंग : एम. एस. श्रीकर हे कर्नाटक राज्य औद्योगिक पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक असतील. टी. एच. एम. कुमार हे कर्नाटक शहरी पाणीपुरवठा व ड्रेनेज बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहणार आहेत. ऊस विकासाचे आयुक्त म्हणून कामगार आयुक्त आणि समवर्ती प्रभारी अक्रम पाशा तर महेश बी. शिरूर यांची कर्नाटक इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण बोर्ड सचिव म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.