बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा यांनी कर्नाटकमधील जनतेच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे. तसेच सरकार देखील या क्षेत्राचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करेल. असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विकासकामांसंदर्भात आढावा बैठक घेतली.
मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, बेंगळूर येथे झालेल्या प्रदेशातील विकासाच्या उपक्रमांचा आढावा घेऊ आयोजित बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
माजी खासदार बसवराज पाटील यांनी प्रदेशाच्या विकासासाठी आराखडा सादर केला. पाटील हे कर्नाटक मानव संसाधन, कृषी आणि सांस्कृतिक संघटनेचे अध्यक्षही आहेत. बैठकीनंतर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी अधिकाऱ्यांना प्रदेशाच्या विकासासाठी टप्प्याटप्प्याने निधी देण्याचे निर्देश दिले आहेत.