बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याला कोरोना लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने राज्यात लसीकरण प्रक्रिया संथ गतीने सुरु आहे. दरम्यान राज्यात लसीकरणाची गती वाढवून जलद गतीने लसीकरण व्हावे यासाठी कर्नाटक सरकारने जागतिक निवड कडून लस खरेदी करण्याचा नितीन घेतला होता, यासाठी निविदाही काढली होती. कर्नाटकने काढलेल्या निविदाला दोन कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान कर्नाटक सरकारने दोन कोटी कोविड -१९ लस घेण्यासाठी जागतिक निविदा काढली होती. याला प्रतिसाद मिळाला असून रशियाच्या स्पुतनिक व्ही आणि स्पुतनिक लाइट लसींचा पुरवठा करण्यासाठी दोन पुरवठादार पुढे आले आहेत.
सोमवारी बंद झालेल्या निविदाला मुंबईस्थित बल्क एमआरओ इंडस्ट्रियल सप्लाय प्रायव्हेट लिमिटेड आणि बेंगळूरस्थित थुलासी सिस्टम्सने प्रतिसाद दिला असून, लस उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात बोली लावण्यात आलेली नाही, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. बल्क एमआरओ इंडस्ट्रियल सप्लाय प्रायव्हेट लिमिटेडने स्पुतनिक व्ही पुरवठा करण्याची ऑफर दिली आहे, तर थुलासी सिस्टीम्सने स्पुतनिक लाइट पुरविण्याची शक्यता व्यक्त केली आहे.