बेंगळूर / प्रतिनिधी
कर्नाटक एमएलसी निवडणुकीमध्ये हसन विभागातून सूरज रेवन्ना यांना विजयी घोषित करण्यात आले. सूरजच्या उमेदवारीमुळे जनता दल सेक्युलर (JD-S) पक्षावर घराणेशाहीचे आरोप झाले तरी टीका होऊनही त्यांनी उमेदवारी दाखल केली होती. सुरज रेवण्णा आमदार एचडी रेवन्ना यांचा मुलगा आणि जेडी(एस) सुप्रीमो आणि राज्यसभा खासदार एचडी देवेगौडा यांचे नातू आहेत.
पक्षाचे सुप्रीमो आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी हसन येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत उमेदवारांबद्दल त्यांचे मत विचारताना हे आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला होता. “हा पिता-पुत्रांचा पक्ष नाही. उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी आमदार, इच्छुक आणि पक्ष कार्यकर्त्यांची मते विचारात घेतली जातील असे गौडा यांनी १२ नोव्हेंबर रोजी जेडी(एस) कार्यकर्त्यांना सांगितले होते. त्यानंतर काही दिवसातच सूरजची त्यांचे आजोबा देवेगौडा यांनी उमेदवार घोषित केली होती.
सुरज रेवण्णा आमदार एचडी रेवन्ना यांचा मुलगा आणि जेडी(एस) सुप्रीमो आणि राज्यसभा खासदार एच.डी. देवेगौडा यांचे नातू 1,533 मतांनी विजयी झाला. त्यांना 2,281 मते मिळाली. त्यांचे विरोधक–काँग्रेसचे उमेदवार एम. शंकर यांना ७४८ तर भाजपचे उमेदवार एच.एम. विश्वनाथ यांना ४२१ मते मिळाली. एकूण 103 मते अवैध ठरविण्यात आली.