बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण केले जात आहे. केंद्राकडून राज्यांना होणार लसीचा पुरवठा संथ गतीने असल्याने लसीकरणाचा वेग कमी आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी काही दिवसांत आम्ही सुमारे २.५ कोटी लसीकरणापर्यंत पोहावचणार असून डिसेंबरअखेरीस आम्ही लसीकरण पूर्ण करू, आम्ही योग्य दिशेने आहोत असे त्यांनी म्हंटले आहे.
आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी आज पंतप्रधानांनी आम्हाला आशा दिली आहे की येत्या आठवड्यात सर्व राज्यांमध्ये अधिक लस उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढणारा आहे. आम्ही लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे ते म्हणाले.