बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार हे नुकतेच कोरोनातून बरे झाल्यांनतर त्यांनी शनिवारी आपण संपूर्ण एक आठवड्यासाठी होम क्वारंटाइन असणार आल्याचे म्हंटले आहे.
शिवकुमार यांनी शुक्रवारी, मी कोविड रुग्णालयातून परत आलो आहे. तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे मी आजारातून बरा झालो आहे. परंतु डॉक्टरांनी मला सल्ला दिला आहे की एक आठवडा कोणालाही भेटू नये. एक आठवड्यासाठी अलग राहणार आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना आवाहन केले हे की कृपया मला भेटायला घरी येऊ नका, कारण माझे कर्मचारी परवानगी देणार नाहीत, असे म्हंटले आहे.
२४ ऑगस्ट रोजी डी. के. शिवकुमार यांना कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी राजानगर येथील रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार शिवकुमार उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याने आणि बरे वाटल्याने त्यांना ३१ ऑगस्ट रोजी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते.
मात्र, शिवकुमार यांना गेल्या आठवड्यात ताप आल्याने पुन्हा त्यांना जयनगरच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आत त्यांना बरे वाटल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मात्र ते एक आठवड्यासाठी कुणालाही भेटणार नाहीत.