बेंगळूर/प्रतिनिधी
वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी, भीषण आर्थिक परिस्थिती असूनही सरकारने पगारवाढीची मागणी मान्य केल्याने डॉक्टरांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
मंगळवारी कर्नाटक शासकीय वैद्यकीय अधिकारी असोसिएशनच्या पधाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. बैठकीनंतरपत्रकारांशी बोलताना मंत्री सुधाकर यांनी ही एक फलदायी चर्चा झाली आहे आणि कष्टकरी डॉक्टरांच्या उन्नतीसाठी सरकारने हा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. डॉक्टर दिवसेंदिवस मेहनत घेतआहेत आणि मुख्यमंत्र्यांनी गेल्या सहा महिन्यांत आरोग्य विभागाने केलेल्या सर्व प्रस्तावांना होकार दिला असून तेही पूर्ण होतील. डॉक्टरांनी केलेल्या मागणीकडे लक्ष दिले असून या यासंदर्भात वित्त विभागाला कळविण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.
तसेच पगारामध्ये ६ वर्ष, १३ वर्ष व डॉक्टरांच्या २० वर्षांच्या पदोन्नतींवर आधारीत सुधारणा करण्यात येईल आणि त्याबाबतचा तपशील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मागविला जाईल. शासनावर हा भार पडला असला तरी त्याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल, असे मंत्री सुधाकर म्हणाले.
यावेळी बैठकीला आरोग्यमंत्री श्रीरामुलू, उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण, तसेच कर्नाटक शासकीय वैद्यकीय अधिकारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.