बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात दररोज कोरोना रुग्णांची संख्या कमी जास्त होताना पहायला मिळत आहे. राज्यात सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटलेली पहायला मिळाली. सोमवारी कर्नाटकमध्ये कोरोनाचे ५,७७३ नवीन रुग्णांची भर पडली तर दिलासादायक बाब त्याच दिवशी ८,०१५ रुग्णांनी कोरोनावर मत करत रुग्णालयातून घरी परतले. आतापर्यंत राज्यात एकूण ३,००,७७० रूग्णांनी कोरोना विरुद्ध लढाई जिंकली आहे. तर राज्यात ९७,००१ रुग्णांचा उपचार सुरू आहेत. यापैकी७९४ रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत एकूण ६,५३४ रूग्णांनी आपला जीव गमावला आहे.