प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक दलित संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून महांतेश तळवार तर सदस्य म्हणून रमेश कोचेकर, रायाप्पा कांबळे, संतोष कांबळे, मनोज अर्जुनकट्टी, चंदकांत तळवार, आप्पासाहेब कंगण्णवर, मारुती कांबळे यांची निवड झाली आहे. राज्याध्यक्ष मावळळी शंकर यांसह गौतम पाटील, सिद्धाप्पा कांबळे, केंप्पण्णा कांबळे, बसवराज तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.