बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा कोरोनामुळे लांबणीवर पडणार असल्याचे संकेत दिले. दरम्यान मंत्री सुरेश कुमार यांनी सोमवारी की दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा नेहमीप्रमाणेच मार्चमध्ये घेण्यात येणार नाहीत, असे म्हंटले आहे.
एका कन्नड वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी एसएसएलसी आणि द्वितीय पीयू विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाईल तसेच या शैक्षणिक वर्षाच्या कार्यक्रमांचे तपशीलवार कॅलेंडर काही दिवसांतच बाहेर पडेल, अशी माहिती दिली.
विद्यार्थ्यांना परीक्षेची चिंता करण्याची गरज नाही आणि यावर्षी उपलब्ध शैक्षणिक दिवसांची संख्या लक्षात घेऊन अभ्यासक्रम कमी होईल याची खात्री करून घेतली. विभाग अधिकारी, शाळा आणि शिक्षक संघटना यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर वेळापत्रक निश्चित केले जाईल, असे मंत्री म्हणाले.