बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक रस्ते वाहतूक महामंडळ कर्मचार्यांनी जाहीर केले आहे की, राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना ६ व्या वेतन आयोगानुसार कर्नाटक सरकार वेतन प्रणाली लागू करेपर्यंत गुरुवारी आणि अनिश्चित काळासाठी बस संप कायम ठेवेल. गुरुवारी सकाळी बेंगळूरच्या मॅजेस्टिक बस टर्मिनलमधील प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून रहावे लागले. दरम्यान प्रवाशांनी सरकारने लवकरात लवकर कर्मचाऱ्यांच्या मागणीवर तोडगा कडून सामान्य नागरिकांचे होणारे हाल वाचवावे अशी मागणी केली आहे.
परिवहन कर्मचाऱ्यांनी संप करण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांना ६ व्या वेतन आयोगाच्या शासकीय पगाराच्या खाली आणले गेले पाहिजे आणि सरकारी कर्मचार्यांप्रमाणे समान सुविधा व प्रोत्साहन दिले पाहिजे. संपाचा परिणाम कमी करण्यासाठी राज्य सरकारने खासगी वाहनांची पर्यायी व्यवस्था केली आहे.