बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान मंगळवारी राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी सांगितले की, कोरोनामुळे दुसर्या लाटेत ९ डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. ही वैद्यकीय चिकित्सकांपैकी सर्वात कमी संख्या आहे. परंतु आयएमएच्या अहवालानुसार ९ ऐवजी २८ डॉक्टरांनी आपला जीव गमावला असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले.
मंगळवारी मंत्री सुधाकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवर याविषयी माहिती दिली होती. कर्नाटकमध्ये डॉक्टरांच्या मृत्यूचे प्रमाण दुसर्या लाटे दरम्यान सर्वात कमी असल्याचे त्यांनी सांगितले होते. देशात कोविड -१९ मुळे बळी पडलेल्या ६४६ डॉक्टरांपैकी ९ डॉक्टर कर्नाटकातील आहेत, असे त्यांनी म्हंटले होते. परंतु आयएमएने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
दरम्यान आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनी ९ डॉक्टरांनी कोरोनाकाळात आपला जीव गमावल्याचे सांगितले पण या वक्तव्यानंतर अवघ्या तासाभरातच आयएमएच्या अहवालानुसार ९ ऐवजी २८ डॉक्टरांनी जीव गमावला असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले. खासगी डॉक्टरांसाठी विमा उतरविण्यात येणार आहे. राज्यात पहिल्या लाटेत एकूण ९१ डॉक्टरांनी आपला जीव गमावला. तर दुसऱ्या लाटेत २८ जणांचा मृत्यू झाल्याचे आयएमएने स्पष्ट केले.