बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. जुलैमध्ये कर्नाटकने दररोज ३५ हजार अँटीजन चाचण्या करण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, मंगळवारी केवळ २८,८६७ अशा चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ११ ऑगस्ट रोजी राज्यातील साथीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना५० हजाराहून अधिक दैनंदिन चाचण्या (ज्यात रॅपिड अँटीजन डिटेक्शन टेस्ट, आरटी-पीसीआर आणि इतर पद्धतींचा समावेश आहे) घेण्याचे आश्वासन दिले होते.
मंगळवारी (१८ ऑगस्ट) ५९,०८८ एकूण चाचण्या घेण्यात आल्या, त्याच सोमवारी (१७ ऑगस्ट) आणि रविवारी (१६ ऑगस्ट) अनुक्रमे, ३७,७०० आणि ४३,६२६ चाचण्या आल्या.